कर्जत

इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात राशीन च्या शेखर भिताडे यांची दमदार कामगिरी  गुणवत्तेच्या जोरावर सातव्या वर्षात पदार्पण 

शिवतंत्र न्यूज

इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात राशीन च्या शेखर भिताडे यांची दमदार कामगिरी 

गुणवत्तेच्या जोरावर सातव्या वर्षात पदार्पण 

शिव तंत्र न्यूज 

  राशीन परिसरात उद्योग व्यवसायांची प्रचंड वेगाने वाढ होत असून यामध्ये बहुजन समाजही पाठीमागे नाही.  तरुण विविध व्यवसायात नशीब आजमवताना दिसून येत आहेत .राशीन येथील शेखर भिताडे यांनी इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल क्षेत्रात तब्बल सहा वर्षे पूर्ण केली असून उत्कृष्ट सेवा व गुणवत्तापूर्ण कामाच्या जोरावर त्यांनी सातव्या वर्षात पदार्पण केले आहे .

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी शेखर भिताडे राशीन परिसरात तशीच कर्जत तालुक्यात प्रसिद्ध आहेत. उसाचा हंगाम सुरू झाला की ट्रॅक्टर ड्रायव्हर बांधवांना वेध लागतात ते साऊंड सिस्टिम बनवण्याचे. कारण उसाचा ट्रॅक्टर व साऊंड सिस्टिम हे समीकरण आहे गेली अनेक वर्ष शेखर हे ट्रॅक्टर ड्रायव्हर बांधवांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. शेखर यांचे शिक्षण आयटीआय इलेक्ट्रॉनिक्स झाले असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स मधील सखोल ज्ञान त्यांना आहे राशीन येथील नामांकित इलेक्ट्रॉनिक्स व्यावसायिक सरकाळे यांच्या चेतना इलेक्ट्रॉनिक्स या नामांकित दुकानात चार वर्ष अनुभवासाठी त्यांनी काम केले त्यानंतर 2019 मध्ये राशीन बस स्थानकासमोर छोट्याशा जागेमध्ये इलेक्ट्रॉनिक्स दुकानाची सुरुवात केली. येथे सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू रिपेरिंग व विक्री योग्य दरात केल्यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढत गेला. सुरुवातीच्या काळात बऱ्याच अडचणी आल्या. पण त्यावर यशस्वीपणे मात करत त्यांनी प्रवास सुरू केला. दर्जामध्ये त्यांनी कधीच तडजोड केली नाही. ग्राहकांना दैवत मानून विनम्र सेवा देण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांच्याकडे दूर दूरवरून ग्राहक येतात. अतिशय उच्च दर्जाची साऊंड सिस्टिम ते बनवतात. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू रिपेरिंग वेळेवर करून दिल्यामुळे त्यांना ग्राहक प्राधान्य देतात. मंडप व्यावसायिकांना लागणारे ऍम्प्लिफायर मशीनची विक्री दुरुस्तीचे काम ते गुणवत्तापूर्ण पद्धतीने करतात. नुकतेच त्यांनी आपल्या व्यवसाय चे स्थलांतर महाराष्ट्र ग्रामीण बँक राशीन शेजारी केले आहे. इथे सुद्धा ग्राहकांची प्रचंड गर्दी होत आहे. सुमारे सात वर्षाचा त्यांना अनुभव पाठीशी असल्यामुळे नवीन जागी सुद्धा आपण यशस्वी होऊ शकतो असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या यशाबद्दल बोलताना ते म्हणतात कोणताही व्यवसाय यशस्वी करताना आपल्यामध्ये कौशल्य असायला हवे. जिद्द, चिकाटी धरली आणि ग्राहकांना दैवत मानून जर आपला व्यवसाय केला तर नक्कीच आपण यशस्वी होऊ शकतो. भविष्यकाळात इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान राशीन सारख्या ठिकाणी उपलब्ध करून देऊन ग्राहकांना अधिकाधिक गुणवत्तापूर्ण सेवा देण्यास आपला भर असेल असेही त्यांनी नमूद केले.

    अतिशय हालाखीच्या परिस्थितीतून पुढे आलेल्या व अल्पावधीत इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये आपले स्थान निर्माण केलेल्या शेखर भिताडे यांची प्रेरणा घेऊन तरुणांनी वेगवेगळ्या व्यवसायामध्ये उतरून यशस्वी होण्याची गरज आहे.

Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close