tembhurni
मार्केटिंग आणि निर्यात क्षेत्रातील विश्वसनीय नाव
शेतकऱ्यांचा आधारस्तंभ ठरलेली बालाजी पाटील फ्रुट्स सप्लायर कंपनी

मार्केटिंग आणि निर्यात क्षेत्रातील विश्वसनीय नाव
शेतकऱ्यांचा आधारस्तंभ ठरलेली बालाजी पाटील फ्रुट्स सप्लायर कंपनी
शिवतंत्र न्यूज

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यामधील बिटरगाव चे उच्चशिक्षित तरुण बालाजी प्रकाश पाटील यांनी आपल्या कंपनीच्या माध्यमातून केळी निर्यात क्षेत्रात जम बसविला आहे. त्यातून अनेक शेतकऱ्यांची शेती विषयीची नकारात्मकता दूर होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. घाम गाळून कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाला जास्तीत जास्त भाव कसा मिळेल, शेतकरी राजा आर्थिक दृष्ट्या सक्षम कसा होईल, यासाठी बालाजी यांची सतत धडपड सुरू असते. फळ पुरवठादार क्षेत्रात कायम चढ-उतार स्पर्धा पहावयास मिळते .अनेक डावपेचांना सामोरे जावे लागते. परिस्थितीनुरूप निर्णय घेऊन मार्केटिंगचे धोरणात बदल करावा लागतो. व्यवसायाच्या या विस्तारलेल्या क्षेत्रात अनेक आव्हानांना सामोरे जाऊन सिंहासारखी कृती करणारा, मार्ग काढणारच यशस्वी होतो. असाच या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची चमक दाखविणारा उद्योजक म्हणजेच करमाळा तालुक्यातील बीटरगावचा उच्चशिक्षित तरुण बालाजी प्रकाश पाटील. उद्योजक बालाजी पाटील यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठातून एमबीए पदवी संपादन केली. वडिलोपार्जित शेती आणि व्यवसाय करण्याचा त्यांचा मानस होता . त्याचबरोबर आपल्या भागात उत्पादित होणाऱ्या मालाचे मार्केटिंग विस्तीर्ण प्रमाणात करण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. त्यानुसार नियोजन करीत कार्यप्रणाली निश्चित केली होती.
वडील ,काका आणि भावाचे मार्गदर्शन
बालाजी यांचे वडील प्रकाश सुभेदार पाटील व चुलते भागवत पाटील यांनी 1993 मध्ये टेंभुर्णी येथे सहकार्य शॉपिंग सेंटर , हॉटेल सहकार्य प्युअर व्हेज हे सुरू केले. टेंभुर्णीत येणारे प्रवासी, व्यापारी यांचे होणारे हाल लक्षात घेऊन 1997 मध्ये शहरात पहिली सत्कार लॉजिंग ही निवासी वास्तू उभा केली. ज्यामुळे टेंभुर्णी शहराच्या विकासाला हातभार लागला. वडिल आणि चुलत्याचे व्यवसायातील प्रयोग व यश बालाजी पाटील यांना पाहिले होते . त्यातूनच त्यांनाही उद्योग व्यवसायात रुची निर्माण झाली. वडील सहकार्य उद्योग समूहाचे सर्वे सर्वा प्रकाश पाटील तसेच शेती व अध्यात्मची आवड असणारी चुलते भागवत पाटील तसेच बंधू कृषी भूषण दादासाहेब पाटील यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभल्यामुळे तसेच कुटुंबाचा प्रमुख व्यवसाय शेती असल्याने बालाजी पाटील यांच्या शेतीमाल व्यापार विषयाच्या ज्ञानामध्ये भर पडत केली.
बालाजी पाटील फ्रुट सप्लायर ची उभारणी रात्रंदिवस घाम गाळून कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाला जास्तीत जास्त भाव कसा मिळेल, शेतकरी राजा आर्थिक दृष्ट्या सक्षम कसा होईल यासाठी बालाजी यांची सतत धडपड सुरू होती. तालुक्यातील केळीचे वाढते क्षेत्र लक्षात घेऊन 2015 मध्ये बालाजी पाटील फुट सप्लायर या कंपनीची उभारणी करून बालाजी यांनी व्यवसायाचा श्री गणेशा केला .
केळी निर्यातीच्या क्षेत्रात जाऊन बालाजी यांची धडपड जिद्द आणि पाहून आनंद तंगले व शिवश्री सचिन खुळे यांच्या सहकार्याने IN FARAMS,SK EXPORTS,WEGROW या कंपनीची वेंडरशिप त्यांना मिळाली. या कंपन्यांच्यामार्फत बालाजी यांनी केली निर्यतीच्या क्षेत्रात जम बसवला. योग्य तो दर , विनम्र व तत्परसेवा चोख व्यवहार यामुळे या क्षेत्रात बालाजी पाटील फुट सप्लायर कंपनी हे एक विश्वसनीय नाव झाले .याचाच परिणाम म्हणून देशी विदेशी कंपन्यांमार्फत माढा तालुक्यातील केळी बालाजी पाटील ग्रुप सप्लायर च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निर्यात होऊ लागली. शेती माल निर्यात वाढीसाठी बालाजी हे दुबईत राहून 40 मोठ्या प्रमाणात केळीची निर्यात केली. त्याचबरोबर त्यांनी इराक , इराण सौदी अरेबिया, अफगाणिस्तान या देशातही शेतीमाल निर्यातीसाठी जोरदार प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी अनेक देशातील व्यापार व्यवसाया संदर्भातील ज्ञान आत्मसात केले . हे करीत असताना व्यवसायाच्या व्यवस्थापनासाठी लहान बंधू स्वप्निल प्रकाश पाटील यांचे मोलाचे पाठबळ लाभले. स्वतः शेतकरी कुटुंबात जन्मल्यामुळे शेती आणि शेतीविषयक अडचणी याविषयी बालाजी यांना चांगली समज आली. त्यांच्या अनेक शेतकरी व्यापारी यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले .त्यातून अनेक शेतकऱ्यांची शेती विषयीची नकारात्मकता दूर करण्याचे काम बालाजी यांनी आपल्या कंपनीमार्फत केले .
सहकार्य ऍग्रो प्रोडूसर कंपनीची स्थापना
शांत संयमी आणि दिलदार व्यक्तिमत्व बालाजी पाटील यांचे नाव टेंभुर्णी आसपासच्या गावात आहे. त्यांनी निर्यात उद्योग क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. बालाजी पाटील हे कुटुंबातील सर्वात थोरले. त्यांच्याबरोबर त्यांचे बंधू स्वप्निल ,निखिल, हर्षद हे ही वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यासाठी बालाजी पाटील यांना नेहमी मार्गदर्शन करतात . सोलापूर जिल्ह्यातून होणारी केळी निर्यातीची वाढ पाहून बालाजी यांनी राजवीर ट्रेडिंग कंपनी सुरू करून ASTRON या नामांकित कंपनीच्या माध्यमातून केळी पॅकिंग साठी लागणारे बॉक्स व KEEP IT FRESH या कंपनीकडून उत्तम दर्जाचे पॅकिंग मटेरियल इतर व्यापारांसाठी उपलब्ध केले . काही शेतकऱ्यांना बरोबर घेत सहकार्य ऍग्रो प्रोड्युसर ही कंपनी स्थापन करून त्या मार्फत केळी निर्यात वाढवली. प्रत्येक व्यक्तीचे गुडवील त्याच्या दैनंदिन व्यवहार, सातत्य या वृत्तीतून तयार होत असते. एकदा चांगले गुडविल निर्माण झाले की त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यातील व्यवसायातील चढउतारांना सामोरे जाताना मदत होते. या स्पर्धेच्या युगात प्रत्येक उद्योजकाने टिकून राहण्यासाठी आपले गुडवील निर्माण करणे तितकेच महत्त्वाचे आहे असे बालाजी पाटील म्हणतात.
कोरोना काळात रुग्णालयाची उभारणी






