कुर्डूवाडी
व्यावसायिक शिखरावर असतानाही सामाजिक बांधिलकी जपणारे शिवपाईक बाबाराजे रिक्षाचालक ते सराफ व्यावसायिक बाबाराजेंचा प्रेरणादायी प्रवास
शिवतंत्र न्यूज

व्यावसायिक शिखरावर असतानाही सामाजिक बांधिलकी जपणारे शिवपाईक बाबाराजे
रिक्षाचालक ते सराफ व्यावसायिक बाबाराजेंचा प्रेरणादायी प्रवास
शिवतंत्र न्यूज

व्यावसायिक उद्योग क्षेत्रात अग्रस्थानी असणारे खूप जण असतात तसेच 24 तास फक्त सामाजिक कार्य करणारेही बरेच आहेत परंतु व्यावसायिक क्षेत्रात प्रचंड यशस्वी असताना त्यातून वेळ काढून सामाजिक बांधिलकीतून तन मन धनाने समाजाची सेवा करणारे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून कुर्डूवाडी चे बाबाराजे बागल यांच्याकडे पाहिले जाते. गेल्या 23 वर्षापासून शिवराय ज्वेलर्स च्या माध्यमातून त्यांनी अपारंपारिक असलेल्या ज्वेलर्स व्यवसायात नावलौकिक मिळवला आहे. शिव शंभू विचारांचे पाईक म्हणून ते तालुक्यात ओळखले जातात. शिवकार्यासाठी आपल्या उत्पन्नातून काही भाग काढून ठेवून मुक्तहस्ताने मदत करणारे आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
शेतकरी कुटुंबात जन्म झालेले दत्तात्रय (बाबाराजे) प्रकाश बागल यांचे परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण करता आले नाही. कमी वयातच त्यांनी 1995 मध्ये रिक्षा घेऊन व्यवसाय सुरू करून कुटुंबाला हातभार लावण्यास सुरुवात केली. पाच वर्ष त्यांनी हा व्यवसाय केला. लहानपणापासूनच त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. त्यामुळे शिवसेना या पक्षाशी जोडले गेले. शिवसेनेच्या विविध संघटनात्मक पदांवर त्यांनी काम केले. रिक्षा व्यवसाय थांबल्यानंतर त्यांनी दत्त पानमेवा हा व्यवसाय देखील काही काळ केला. हे करत असताना त्यांच्या मित्र परिवारातील बरेच जण बेरोजगार होते. भांडवलाअभावी त्यांना उद्योग व्यवसाय करता येत नव्हता. या गरजेतून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पतसंस्थेची उभारणी केली. नातेवाईक , मित्रपरिवार यांना उद्योग उभारणीत या माध्यमातून मदत केली परंतु म्हणतात ना कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. ज्यांना कर्ज उपलब्ध करून दिले, स्वावलंबी बनवले .जवळच्या व्यक्तींनीच कर्ज वेळेवर न भरल्यामुळे पतसंस्था डबघाईला आली. ठेवीदारांनी खूप विश्वासाने बाबाराजेंच्या विश्वासावर गुंतवणूक केली होती. आणि म्हणून या विश्वासाला तडा जाऊ नये यासाठी त्यांनी आजवर उद्योग व्यवसाय करत जमा झालेली तसेच आणखी रक्कम जमा जमा करून 40 ते 50 लाख रुपये गुंतवणूकदारांचे पैसे परत करत पतसंस्था सन्मानाने बंद केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने पतसंस्था असल्याने महाराजांच्या नावाचा कुठे अवमान होऊ नये यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले. एवढ्या मोठ्या आर्थिक नुकसानीचा त्यांच्या आर्थिक नियोजनावर दूरगामी परिणाम झाला. सार्वजनिक जीवनात उजळ माथ्याने वावरता यावे यासाठी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. राजकारणात असेच अनुभव येऊ लागल्याने त्यांनी उद्योग व्यवसायात क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. स्वतःकडे फक्त दोन लाख रुपये होते. तसेच युनियन बँकेतून पाच लाख रुपये कर्ज घेऊन असे सात लाख रुपये भांडवल उभे केले .कोणता व्यवसाय सुरू करावा याची बरेच दिवस विचार मंथन केल्यानंतर सराफ व्यवसायात उतरण्यासाठी त्यांनी निर्णय घेतला. बहुतांशी सराफ व्यवसायिक ग्राहकांची फसवणूक करतात.कमी कॅरेटचे सोने असताना ज्यादा दराने पैसे घेतात. सर्वसामान्य शेतकरी तसेच शेतमजूर सैनिक बांधवांना , देशासाठी झटणाऱ्या लोकांना प्रामाणिकपणे सेवा देण्याचे ब्रीद घेऊनच बाबाराजे उतरले होते. सराफ व्यवसायात कितीही भांडवल असले तरी ते कमीच पडत असते. मात्र बाबाराजे यांनी समाजात सेवाभाव पेरला होता. हीच दौलत त्यांच्या कामी आली. त्यांच्या मित्रपरिवार तसेच हितचिंतकांना सराफ व्यवसाय सुरू केल्याची माहिती पोहोचताच ज्यांच्याकडे पैसे शिल्लक आहेत त्यांनी बाबाराजेंकडे पैसे ठेवण्यास सुरुवात केली आणि बिगर व्याजाचे लाखो रुपये भांडवल त्यांच्याकडे जमले. भांडवलाचा प्रश्न मिटला. जनसंपर्क असल्याने ग्राहकांची कमतरता कधीच भासली नाही. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचे चरित्र त्यांच्या वाचनात आले आणि बाबाराजे यांची आयुष्य अंतर्बाह्य बदलून गेले. शिवरायांनी जसे सर्व सामान्य रयतेला पोटास लावले. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या ग्राहकांना सेवा देण्यास सुरुवात केली. राजकारणाला रामराम केल्यामुळे पूर्ण वेळ त्यांनी व्यवसायात वाहून घेतले. अल्पावधीतच त्यांनी बाजारपेठ काबीज केली. व्यवसायात देखील त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली सीमेवरील सैनिक, पोलीस बांधव, वीर मरण आलेल्या सैनिकांच्या वीरमाता, शेतकरी बांधव यांना प्रति तोळा 500 रुपये सवलत ते बाराही महिने देतात. तसेच शिवजयंती, छत्रपती संभाजी महाराज जयंती तसेच सर्व राष्ट्रपुरुषांच्या जयंती निमित्त सवलत देण्यात येते. तसेच सर्व दागिन्यांवर ज्या कॅरेट चे सोने असते त्याच कॅरेट चा शिक्का असतो. ग्राहक पूर्णपणे समाधानी राहतील याची विशेष काळजी शिवराय ज्वेलर्स कडून घेण्यात येते. व्यवसायाचे नाव शिवराय देण्यावरून काही हितचिंतकानी विरोध केला होता. इतर समाजातील ग्राहक येणार नाहीत, नुकसान होईल असाही त्यांना सल्ला दिला होता मात्र बाबाराजे आपल्या निर्णयावर ठाम होते. गेली 23 वर्षे समर्थपणे हा व्यवसाय सुरू आहे. अठरा पगड जातीतील ग्राहक त्यांच्याकडे आवर्जून येतात. सर्व समाजातील ग्राहकांना ते समान वागणूक देतात . त्यामुळे जात धर्म न पाहता त्यांच्याकडे ग्राहकांची गर्दी असते. ह ग्राहकांना सोन्याच्या गुणवत्ता, शुद्धते बाबत माहिती नसायची त्यामुळे त्यांची खूप वेळा फसगत व्हायची. बाबाराजे यांनी ग्राहकांना शिक्षित केले. त्यामुळे त्यांचे होणारे नुकसान वाचले. ग्राहकांच्या समाधानाला सर्वोच्च स्थान निर्माण दिल्यामुळे शिवराय ज्वेलर्स हे नाव माढा तालुका व परिसरामध्ये विश्वास साठी आणि गुणवत्तापूर्ण सुवर्ण पेढी म्हणून ओळखली जाते.. शिवराजे व संभाजी राजे ही त्यांची दोन मुले, दोन कामगार व ते स्वतः असे सहा ते सात जण शिवराय ज्वेलर्स मध्ये काम करतात.

व्यवसायात दिवसेंदिवस प्रगती होत असताना बाबाराजेंनी सामाजिक कार्य देखील अविरत सुरू ठेवले. निराधार शालेय 120 विद्यार्थिनींना त्यांनी सायकल वाटप केले. शिव शंभू विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि त्यातून शिवाजी महाराजांचे चरित्र घरोघरी पोहोचावे यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. गावागावात शिवशंभू स्मारक असावे हे त्यांचे स्वप्न आहे. स्मारक उभारणीसाठी ते सर्वतोपरि कार्य करतात. कुर्डू, चिंचगाव, कळस, रोपळे , रिधोरे आदी गावात शिवस्मारक उभारणीकामी आर्थिक सहकार्य त्यांनी केले. गावागावात जाऊन शिवशंभू चरित्र समजून सांगून नागरिकांना शिव विचारावर वाटचाल करण्यासाठी आवाहन करतात. परिसरात गरजू अनाथ मुलींच्या विवाह प्रसंगी भांडी वाटप देखील त्यांनी केले. अनाथ मुलींच्या विवाहप्रसंगी भांडीवाटप देखील त्यांनी केले. नुकतेच त्यांनी छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त गोशाळेला चारा वाटप देखील केले. मुंबई येथे संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चा मध्ये त्यांनी अन्नदानाचे काम केले. तसेच गेल्या वर्षी माढा तालुक्यात आलेल्या भीषण पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना देखील त्यांनी मदत केली. कोरोना महामारीच्या काळात गरजू नागरिकांना अन्नधान्य किटचे वाटप त्यांनी केले. सहा जून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगड किल्ल्यावर भव्य सोहळ्यासाठी त्यांनी आर्थिक मदत देखील दिली आहे. शिवराय ज्वेलर्स मार्फत प्रत्येक महापुरुषांची जयंती उत्साहात साजरी केली जाते.यानिमित्त ग्राहकांना भरपूर सवलत देखील ते देतात. शिवजयंती निमित्त ते शिवचचरित्राचे वाटप देखील करतात. आजपर्यंत 350 शिवग्रंथ त्यांनी वाटप केले आहे. शिवचरित्र तसेच शिवप्रतिमा घरोघरी असावी यासाठी ते पुढाकार घेतात. आजपर्यंत त्यांनी हजारो नागरिकांना शिव शंभू प्रतिमा भेट दिल्या आहेत. आता ते छत्रपती संभाजी राजे यांच्या प्रतिमा भेट देत आहेत. कोरोना काळात उल्लेखनीय काम केलेल्या कोरोना योद्धांचा त्यांनी शिव गौरव पुरस्कार देऊन गौरव केला आहे. शिवराय ज्वेलर्सची ख्याती तालुक्यातच नाही तर सोलापूर जिल्हा, पुणे जिल्ह्यात देखील पसरली आहे. जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरून देखील ग्राहक त्यांच्याकडे नियमितपणे येतात.
आपल्या तरुण बांधवांना मोलाचा संदेश देताना ते म्हणतात की आपण शिव शंभू चरित्र अभ्यासा. यातून आपल्याला संकटाशी लढण्याची. स्वतःचे साम्राज्य निर्माण करण्याची प्रेरणा मिळेल. नोकरीच्या पाठीमागे न लागता छोटासा का होईना स्वतःचा व्यवसाय सुरू करा. स्वामी विवेकानंद, रतन टाटा यांच्यासारख्या महान राष्ट्रपुरुषांची चरित्र अभ्यासा. तसेच अगोदर शिक्षणाला प्राधान्य द्या. कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. निर्व्यसनी रहा तरच आपण व्यवसायात पर्यायाने जीवनात यशस्वी होऊ शकता.




