कुर्डूवाडी

श्रीकृष्ण मार्ट च्या माध्यमातून कुर्डूवाडीकरांना मिळतोय परिपूर्ण खरेदीचा अनुभव मोठ्या शहरांप्रमाणेच सर्व सुविधांनी युक्त मॉलला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद

शिवतंत्र न्यूज

श्रीकृष्ण मार्ट च्या माध्यमातून कुर्डूवाडीकरांना मिळतोय परिपूर्ण खरेदीचा अनुभव

मोठ्या शहरांप्रमाणेच सर्व सुविधांनी युक्त मॉलला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद

 

शिवतंत्र न्यूज 

 

    नुकतेच कुर्डूवाडी माढा रोडवर उड्डाणपुला नजीक श्रीकृष्ण मार्ट हे भव्य व सुसज्ज दालन सुरू झाले आहे. बारलोणी येथील तरुण व्यावसायिक जोतिराम अवताडे यांनी व सौ रुपाली या दांपत्यांनी हे मार्ट सुरू केले आहे. कुर्डूवाडी शहरातील हा एक प्रशस्त व अत्याधुनिक मॉल असल्यामुळे सुरुवातीपासूनच ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

जोतीराम आवताडे हे गेल्या पंधरा वर्षांपासून एचडीएफसी बँकेत नोकरीला होते. अतिशय प्रामाणिकपणे ते हे काम करत होते. नोकरी करत असताना स्वतःचा व्यवसाय असला पाहिजे असे त्यांना सारखे वाटायचे. परंतु भांडवल नसल्यामुळे ते व्यवसाय सुरू करू शकले नाही. त्यांच्या सौभाग्यवती सौ रुपाली या प्राध्यापिका आहेत. बरेच वर्षे त्यांनी एका महाविद्यालयात कमी वेतनावर काम केले. नुकतेच त्या पूर्ण पगारावर रुजू झाल्या आहेत. जोतीराम व सौ रुपाली यांनी विचार विनिमय करून खूप दिवसापासून त्यांचे स्वप्न असलेला व्यवसाय उभारण्याचा निर्णय घेतला. सौ रूपाली यांची कुर्डूवाडी बायपास नजीक जागा होती. त्या ठिकाणी प्रशस्त बांधकाम केले. पैशाची अडचण होतीच . स्वतः जवळचे, नातेवाईक तसेच अन्य मार्गातून पैशांची उभारणी करून प्रशस्त व भव्य मॉल उभारण्याचे ठरले. श्रीकृष्ण मार्ट या नावाने हा व्यवसायाचा त्यांनी प्रारंभ केला. बांधकाम ते मॉल उभारणीपर्यंत बराच खर्च आला.

या ठिकाणी सर्व प्रकारचा किराणामाल ,स्टेशनरी, कटलरी, सौंदर्यप्रसाधने, विविध प्रकारचे प्लास्टिक मटेरियल, गिफ्ट आर्टिकल्स शोभिवंत वस्तू, विविध देवी देवतांचे फ्रेम, सर्व प्रकारचे संसार उपयोगी साहित्य सर्वकाही एकाच छताखाली मिळते. दोघेही ग्राहकांच्या सेवेसाठी तत्पर असतात. ग्राहकांशी सुसंवाद साधत अत्यंत आपुलकीने त्यांची चौकशी करतात. सुमारे 3500 चौरस फूट एवढ्या प्रशस्त जागेत हा मॉल आहे. एवढी मोठी जागा असल्यामुळे आरामदायक रित्या ग्राहकांना पाहिजे त्या वस्तू खरेदी करता येतात. मॉल मधील कामगार देखील आलेल्या सर्व ग्राहकांना खरेदीसाठी उत्तम सेवा देत मदत करतात. अत्यंत माफक दर हे या मॉलचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. इतर दुकानापेक्षा कमी दरात ग्राहकांना वस्तू येथे मिळतात. कोणत्याही प्रकारची ग्राहकांची फसवणूक करायची नाही, ग्राहकांच्या पैशांची बचत कशी होईल अशी प्रणाली राबवण्याचा संकल्प या दांपत्याने केला आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासून ग्राहक संख्या भरपूर आहे. कुर्डूवाडी शहर, भोसरे तसेच परिसरातील जवळ जवळ 30 गावांमधील ग्राहक या मॉलला आवर्जून भेट देतात. या मॉल चे आणखी वैशिष्ट्य म्हणजे इथे प्रशस्त अशी पार्किंग व्यवस्था आहे. शहरांमध्ये खरेदीसाठी गेल्यानंतर चार चाकी वाहने लावण्यासाठी जागा नसते. त्यामुळे अडचण निर्माण होते. प्रत्येक वस्तूमध्ये विविधता देखील ते पाहण्यास मिळते. प्रत्येक वस्तूच्या असंख्य व्हरायटी येथे उपलब्ध आहेत. विविध सण उत्सव प्रसंगी आवश्यक अशा सर्व वस्तू आवर्जून येथे ठेवल्या जातात. जसे की रक्षाबंधन,व गौरी गणपती. आरास, मुखवटे , सजावटीचे सर्व साहित्य येथे मिळते. श्रीकृष्ण मार्ट ला अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची स्वप्न असल्याचे आवताडे दाम्पत्य सांगतात. ग्राहकांना कोणतीही असुविधा निर्माण होऊ नये तसेच श्रीकृष्ण मार्ट प्रति विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी आपण अधिकाधिक प्रयत्नशील राहू असे हे प्रतिपादन या उभयतांनी केले आहे. या मार्टला शहर व परिसरातील प्रत्येक नागरिकांनी आवर्जून एकदा तरी भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

दोघांच्याही परिवारात कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना प्रचंड मोठे धाडस करत हा व्यवसाय उभा  करून तो यशस्वीरित्या चालवणाऱ्या या आवताडे परिवाराच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close