माढा

लाकडी घाण्यावरील तेलाची युवा अभियंत्याकडून निर्मिती

शिवतंत्र न्यूज

लाकडी घाण्यावरील तेलाची युवा अभियंत्याकडून निर्मिती

शिवतंत्र न्यूज 

    कापसेवाडी (जि. सोलापूर) येथील युवा अभियंता संदीप कापसे व कुटुंबीयांनी लाकडी घाण्यावरील तेलनिर्मितीचा ‘स्टार्टअप’ केला आहे. सुमारे नऊ प्रकारच्या शुद्ध आणि आरोग्यदायी तेलांचे उत्पादन घेतले जात असून, सोलापूरसह अन्य जिल्ह्यांत सुमारे ३० विक्री केंद्रांमध्ये त्यास बाजारपेठ मिळवण्यात कापसे यशस्वी ठरले आहेत.

     कापसेवाडीचा युवा शेतकरी
पसेवाडी (ता. माढा, जि. सोलापूर) येथे संदीप कापसे या युवा शेतकऱ्याची २२ एकर शेती आहे. वडील नंदकिशोर आणि चुलते नेताजी असे एकत्र कुटुंब आहे. शेती बागायती असून, १२ एकर ऊस, दोन एकर ज्वारी, सहा एकर भुईमूग, दोन एकर करडई अशी पिके आहेत. संदीप यांचे वडील नंदकिशोर शिक्षक, तर चुलते नेताजी शेती करतात.

    संदीप यांनी बी.ई. (मेकॅनिकल), तर बहीण विशाखा यांनी **बी.एस्सी.**चे शिक्षण घेतले आहे. चुलत भाऊ समर्थ, साईराज यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्यांच्या एकत्रित कामातूनच शेती व्यवसायाला चांगली उभारी मिळाली आहे.
कौशल्यातून उद्योगाला खतपाणी
संदीप यांनी दोन वर्षे पुण्यात खासगी कंपन्यांत नोकरी केली. पुढे नामवंत चारचाकी वाहन कंपनीच्या विक्री शोरूममध्ये ‘मार्केटिंग’ विभागाचा अनुभव घेतला. कौशल्याच्या आधारे कमी कालावधीत १० ते १५ लाखांच्या ८ ते १० वाहनांची विक्री आपल्याला शक्य होत असेल, तर स्वतःचा व्यवसाय सुरू करून त्यात असे यश का मिळवू नये, असा विचार संदीप यांच्या मनात आला.

      दरम्यान, लॉकडाउनही सुरू झाला होता. संदीप गावी परतले. लाकडी घाण्यावरील तेलनिर्मितीत संधी दिसली. शेतकरी उत्तम पिकवतात, त्यांना अन्नही तसेच मिळाले पाहिजे, असाही विचार होता. घरातील सदस्यांसोबत चर्चा, अभ्यास, अर्थकारण तपासल्यानंतर उद्योगात उतरण्याचे निश्चित केले.

     बहीण विशाखानेही मदत केली. खाद्यतेल अधिक शुद्ध, सात्त्विक असणं गरजेचं आहे. अलीकडील काळात बाजारात प्रक्रिया केलेले म्हणजे ‘रिफाइन्ड’ तेल मिळते. मात्र लाकडी घाण्यावर गाळलेले तेल अधिक नैसर्गिक, चवीला नैसर्गिक, ताजे व आरोग्यदायी असल्याने ग्राहकांचा त्याकडे अधिक ओढा आहे.

दोन स्तरावर निर्मिती

माढ्यातच वैराग रस्त्यावर प्रकल्प उभारला. सुमारे अडीच लाखांचे दोन घाणे खरेदी केले. सुरुवातीला दहा लाखांचे भांडवल उभारले. आजची गुंतवणूक सुमारे १४ लाख रुपये आहे.एका घाण्यावर व्यावसायिक निर्मिती होते, तर दुसऱ्या घाण्यावर शेतकरी वा ग्राहकांकडून धान्य आणून, केवळ धान्यपेंडाच्या बदल्यात गाळप करून दिले जाते. त्यासाठी अतिरिक्त पैसे घेतले जात नाहीत.

    आज सुमारे नऊ प्रकारचे म्हणजे शेंगदाणा, सूर्यफूल, करडई, बदाम, मोहरी, तीळ, जवस आणि एरंडी तेलाचे उत्पादन करण्यात येते.

तेल गाळपाची प्रातिनिधिक पद्धत
(भुईमूग)

गाळपाआधी शेंगदाण्याचे वजन केले जाते.
सुरुवातीला १२ किलो शेंगदाणे घाण्यात टाकण्यात येतात.
शेंगदाणा थोडा बारीक झाल्यानंतर थोडे पाणी शिंपडले जाते.
दहा मिनिटांत तेल तयार व्हायला सुरुवात होते.
संपूर्ण तेल तयार व्हायला ४५ ते ५० मिनिटे लागतात.
१२ किलो शेंगदाण्यांपासून सुमारे चार ते साडेचार लिटर तेल मिळते.
तेल तयार झाल्यानंतर पेंड बाजूला काढली जाते.
त्यानंतर दुसरा घाणा सुरू केला जातो.

    गाळप केलेले तेल दोन दिवसांपर्यंत थंड होण्यासाठी टाकीत ठेवले जाते. दोन दिवसांनी गाळ तळाशी येतो. वरील तेल कापडाच्या साह्याने गाळून घेतले जाते. त्यानंतर थेट बॉटलमध्ये पॅकिंग होते. थोड्या फार फरकाने अन्य गळीत धान्यांपासूनही असेच गाळप केले जाते.

बाजारपेठ आणि उत्पादन
उत्पादकता

bसुमारे एक किलो शेंगदाण्यापासून ४० टक्के तेल मिळते. एका लिटरसाठी किमान पावणेतीन किलो शेंगदाणे लागतात. पाच किलो करडईपासून एक लिटर तेल मिळते. सूर्यफुलासाठीही हेच प्रमाण आहे.

     गाळपासाठीचा कच्चा माल शेतकऱ्यांकडून तसेच खरेदीदारांकडून घेतला जातो. एकसारख्या गुणवत्तेचा कच्चा माल मिळण्यासाठी ठरावीक शेतकऱ्यांची निवड केली आहे. त्यांना त्यासाठी बियाणेही पुरवण्यात येणार आहेत.

स्वतःच्या शेतातही सहा एकरांत भुईमूग व दोन एकरांत करडई लागवड केली आहे.

रहस्य’ तेल ब्रँड

लाकडी घाण्यासह संदीप यांनी ‘रहस्य’ हा तेल ब्रँड तयार केला आहे. विविध प्रकारच्या तेलांचे आकर्षक पॅकिंग आणि  

मार्केट

संदीप सांगतात, की बाजारातील रिफाइंड तेलापेक्षा थोडे जादा पैसे या तेलासाठी मोजावे लागतात.. मात्र आमच्याकडे या तेलाचे प्रत्यक्ष उत्पादन व त्याची गुणवत्ता, फायदे पाहा, असे आवाहन त्यांना करतो.

      ते पूर्ण नैसर्गिक असून त्यात कोणतेही रासायनिक घटक वापरले जात नाहीत. विविध प्रदर्शने, जाहीर कार्यक्रम, परिसंवाद, मॉर्निंग वॉकच्या जागा आदी ठिकाणी स्टॉल्स लावून तेलाचे ‘प्रमोशन’ केले.

     सोलापूर जिल्ह्यात सुमारे ३० केंद्रे तयार केली असून, औरंगाबाद व मुंबई (अंधेरी) येथेही पॅकिंगचे व व्यावसायिक केंद्र तयार केले आहेत.

विक्री

सध्या महिन्याला सुमारे १५०० ते १६०० लिटर तेलाची विक्री होते. त्यात शेंगदाणा आणि करडई प्रत्येकी ५०० लिटर, खोबरेल तेल ३०० लिटर आणि उर्वरित २०० लिटरमध्ये अन्य तेलांचा समावेश आहे.
२०० मिली, ५०० मिली, एक लिटर ते पाच लिटरपर्यंतचे आकर्षक पॅकिंग, ब्रँडिंग केले आहे. ‘फूड सेफ्टी’, शॉप ॲक्टचे परवाने तसेच ISO 9001:2015 चे प्रमाणपत्र मिळाले आहे.

पेंडची विक्री

गाळपानंतर उपलब्ध होणाऱ्या पेंडाची दूध उत्पादकांना विक्री होते. धान्याच्या प्रकारानुसार ३० ते ४० रुपयांपासून ५० ते ६० रुपयांपर्यंत विक्री होते. उत्पादनाच्या पेंडीलाही शेतकरी व पशुपालकांकडून चांगली मागणी आहे.

संदीप कापसे : ७८४३०२२३३३

Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close