Uncategorized

करमाळा तालुका फ्रेंड सर्कल कडून पूरग्रस्त 71 शेतकऱ्यांना खत वाटप

शिवतंत्र न्यूज नेटवर्क करमाळा (प्रतिनिधी)

करमाळा तालुका फ्रेंड सर्कल कडून पूरग्रस्त 71 शेतकऱ्यांना खत वाटप

करमाळा (प्रतिनिधी )

करमाळा तालुक्यातील सीना कार्डच्या पूरग्रस्त बाधित ७१ शेतकऱ्यांना करमा तालुका फ्रेंड सर्कल कडून 71 डीएपी खत गोण्यांचे वाटप करण्यात आले .

करमाळा तालुक्यातील तरडगाव बाळेवाडी पोटेगाव बोरगाव खांबेवाडी पोथरे, निलज खडकी या गावातील शेतकऱ्यांना या मदतीचे वाटप करण्यात आले. करमाळा तालुका फ्रेंड सर्कल हा करमाळा तालुक्यातील अधिकारी जे इतरत्र सेवेत आहेत अशा काही अधिकारी मित्रांनी एकत्र येत सामाजिक कार्यासाठी केलेला ग्रुप आहे या ग्रुपच्या माध्यमातून वेळोवेळी विधायक उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून नुकत्याच आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शेती विषयक मदत करण्याची संकल्पना पुढे आली करमाळा तालुक्यातील मूळचे सावडी येथील असलेले उपजिल्हाधिकारी रामहरी भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी मदतीची हाक दिली आणि बघता बघता अनेक हात पुढे आले. सुमारे 50 अधिकारी व व्यवसायिकांनी या उपक्रमासाठी हातभार लावला. जमा झालेल्या निधीमधून 71 शेतकऱ्यांना प्रति शेतकरी एक गोणी याप्रमाणे 71 डीएपी गोणी यांचे वाटप करण्यात आले. यावेळी करमाळा तालुका फ्रेंड सर्कल प्रतिनिधी म्हणून शिवाजी क्षीरसागर, गौतम शेलार हे उपस्थित राहिले. शेतकऱ्यांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. या उपक्रमाबाबत बोलताना राम हरी भोसले म्हणाले की शासन बाधित लोकांना नक्कीच मदत करणार आहे परंतु करमाळा तालुक्यातील रहिवासी म्हणून आपल्या लोकांप्रती संवेदना असणे गरजेचे आहे. याच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आम्हाला शेतकऱ्यांना मदत करावीशी वाटली या पुढील काळात सुद्धा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी आणि ज्या ज्या वेळेस येथील नागरिकांना गरज असेल त्या त्या वेळेस करमाळा तालुका प्रेम सर्कल लोकांच्या मदतीला धावून जाईल.

 

यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने पोथरे गावचे माजी सरपंच हरिश्चंद्र झिंजाडे म्हणाले की अशाच प्रकारचे उपक्रम समाजातील इतर वर्गाने सुद्धा राबवावेत. करमाळा तालुका फ्रेंड सर्कलचे कार्य नक्कीच कौतुकास्पद असून येणाऱ्या काळासाठी हा उपक्रम दिशादर्शक ठरेल. संपूर्ण उपक्रमाचे संयोजन फ्रेंड सर्कलचे सदस्य अतुल वारे पाटील यांनी केले.

Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close