करमाळाबिझनेस

ट्रॅक्टर ड्रायव्हर ते बांधकाम साहित्य व्यावसायिक.. करमाळ्यातील युवकाचा थक्क करणारा प्रवास

शिवतंत्र न्यूज नेटवर्क

ट्रॅक्टर ड्रायव्हर ते बांधकाम साहित्य व्यावसायिक.. करमाळ्यातील युवकाचा थक्क करणारा प्रवास

शिवतंत्र न्यूज नेटवर्क 

 

 

      पिढ्यानपिढ्या ज्यांच्या व्यवसायात गेल्या अशांनी एखाद्या व्यवसायात अत्युच्च प्रगती साधली तर नवल नसावे मात्र कोणतीही पार्श्वभूमी नसताना एक ट्रॅक्टर ड्रायव्हर चक्क बांधकाम व्यवसायात करोडो रुपयांचे साम्राज्य उभे करू शकतो असे म्हटले तर विश्वास बसणार नाही. पण ती किमया साधली आहे करमाळा येथील अमोल ढवळे यांनी. अत्यंत बिकट परिस्थितीतून वाटचाल करत त्यांनी बांधकाम साहित्य क्षेत्रात इतिहास रचला आहे .

   अमोल ढवळे यांचे करमाळा येथे शिवम बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स नावाचे दुकान आहे. त्यांच्याकडे श्री सिमेंट व अंबुजा सिमेंट एजन्सी आहे. त्याचबरोबर अल्ट्राटेक , चेट्टीनाड,प्रिया,झुआरी कंपनीचे सिमेंट मिळते . तसेच स्टीलमध्ये आयकॉन व उमा,राजुरी या नामांकित ब्रँडचे स्टील मिळते. खडी वाळू ,क्रश सॅन्ड आदी देखील त्यांच्याकडे मिळते . लवकरच ते पत्रा कंपनी सुरू करणार आहेत . या माध्यमातून सर्व रंगातील सर्व साईज मध्ये पत्रे ,चॅनेल ,अँगल ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. या व्यवसायाची संकल्पना कशी सुचली याबाबत बोलताना त्यांनी सांगितले हे आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक असल्यामुळे लहानपणापासून मिळेल ते काम करत मी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. दुसऱ्याच्या ट्रॅक्टर वर ड्रायव्हर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. या ट्रॅक्टरच्या माध्यमातून खडी ,क्रश सप्लाय करण्याचे काम मी करत होतो. 2005 सालापासून माझी धडपड सुरू होती. दुसऱ्याच्या ट्रॅक्टरवर काम करताना आपणही व्यवसाय सुरू करावा ही उर्मी स्वस्थ बसू देत नव्हती याच प्रेरणेतून 2010 मध्ये नवीन ट्रॅक्टर घेतला. यशस्वी होण्यासाठी कितीही कष्ट करण्याची तयारी होती. पुढे काही दिवसात टिप्पर देखील घेतला . अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून टिप्पर साठी 15 लाख रुपये अर्थसहाय्य मिळाले होते. महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या हस्ते मला टिप्परची चावी मिळाली होती. टिपर, ट्रॅक्टरच्या माध्यमातून बांधकाम साहित्य पुरवठा करत होतो. यातूनच आपणही हा व्यवसाय सुरू करू शकतो असा विश्वास निर्माण झाला .आणि 2020 साली अहमदनगर सोलापूर हायवे वर करमाळा बायपास लगत शिवम बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स नावाने व्यवसाय सुरू केला . या व्यवसायात मी नवखा असलो तरी प्रत्यक्षरीत्या दहा वर्षापासून माझा व्यवसायाशी संबंध आला होता. त्यामुळे आत्मविश्वासाने या व्यवसायाला झोकून दिले .ग्राहकांबरोबर अगोदरच चांगले संबंध असल्यामुळे हा व्यवसाय पुढे नेण्यासाठी फारसे कष्ट पडले नाहीत दिवसा गणिक प्रगतीचा आलेख उंचावत राहिला . शून्यातून मी हा प्रवास सुरू केला होता. फक्त पाच लाख भांडवलावर व्यवसायाचा शुभारंभ केला होता. त्यामुळे आपल्याला ग्राहकाशी चांगले व्यवसायिक संबंध प्रस्थापित करणे, ग्राहकांचा विश्वास जिंकणे क्रमप्राप्त होते . ग्राहकांना उत्तम सेवा प्रदान करत गेलो आणि त्याचे फळ म्हणून अल्पावधीत या व्यवसायात यशस्वी झालो. 2022 – 23 मध्ये अल्ट्राटेक या सिमेंट कंपनीकडून तालुक्यात विक्रमी विक्री केल्याबद्दल बुलेट दुचाकी गाडी बक्षीस म्हणून मिळाली. तसेच मलेशिया , कतार येथे पर्यटनाची संधी मिळाली. नुकतेच सर्वाधिक व्यवसायाबद्दल अल्ट्राटेक कंपनीकडून 50 ग्रॅम सोने बक्षीस मिळाले . तसेच व्हिएतनाम या देशाची सहलही कंपनीने कडून आणली. श्री सिमेंट कंपनीकडून उत्कृष्ट काम केल्याबद्दल अर्धा किलो चांदी बक्षीस मिळाले. आजपर्यंत 10 ते 12 देशांमध्ये सहलीची संधी उत्कृष्ट व्यवसाय केल्याबद्दल मला प्राप्त झाली. छोटी-मोठी बक्षीस किती मिळाली याची गणतीच नाही. सुरुवातीला भाड्याच्या जागेत व्यवसाय सुरू केला होता. त्यामुळे काळाची गरज ओळखून निरंकारी मंडळात 16 गुंठे जागा दोन कोटी रुपयांना विकत घेतली. या ठिकाणी व्यवसायाचे स्थलांतर केले. या अगोदर मी दुसऱ्याकडे कामगार म्हणून काम केले होते. आज माझ्याकडे 15 कामगार काम करत आहेत . व्यवसाय वाढीसाठी बक्षीस योजना देखील राबवली होती .विजेत्यांना एसी , पाच ग्राम सोने, चांदी यासारखे बक्षीस दिली होती पाच लाख रुपयांपासून सुरू झालेल्या व्यवसायातील भांडवल पाच कोटीपर्यंत पोहोचले आहे. 

   मागे वळून पाहताना आपण एवढ्या उंचीवर पोचलो यावर विश्वास बसत नाही. समाजातील बांधवांना संधी देताना ते म्हणतात जागेपणी स्वप्न बघा आणि ती पूर्ण करण्यासाठी रात्रीचा दिवस करा, तुम्ही नक्की यशस्वी होणार. मला जे मिळाले ते तुम्हाला सुद्धा मिळेल, यासाठी आशावादी राहा.नक्कीच अमोल ढवळे यांच्या यशोगाथेतुन संकटांशी दोन हात करत यशाकडे कशी वाटचाल करायची याची प्रेरणा मिळते

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close