करमाळासामाजिक

करमाळा तालुका फ्रेंड्स सर्कल कडून विविध क्षेत्रातील यशस्वीतांचा सन्मान ,

श्री.रा.शि.भोसले यांना करमाळा मित्र पुरस्कार प्रदान करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुका फ्रेंड्स सर्कल कडून विविध क्षेत्रातील यशस्वीतांचा सन्मान ,

श्री.रा.शि.भोसले यांना करमाळा मित्र पुरस्कार प्रदान

करमाळा (प्रतिनिधी)

आज दि.२२ ऑक्टोबर २०२५ रोजी ज्योतिर्लिंग मंगल कार्यालय ,कुभेज फाटा,करमाळा येथे भव्यदिव्य स्नेहसंमेलन कार्यक्रमात करमाळा तालुक्यातील ज्यांनी विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळवले आहे तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी पुणे येथे राजशिष्टाचार विभागात कार्यरत असलेले उपजिल्हाधिकारी श्री रा.शि.भोसले यांना प्रतिष्ठेच्या करमाळा मित्र पुरस्काराने गौरवण्यात आले.
विचारपिठावर महाराष्ट्राचे GST सह आयुक्त राजेंद्र कुऱ्हाडे, कल्याण डोंबिवली मनपा उपायुक्त रामदास कोकरे आदी उपस्थित होते.
*या वर्षीचे यशस्वी झालेले सत्कारमूर्ती*-
अमर देवकाते -CA धायखिंडी , गौतम शेलार,सावडी -Ph D. , प्रवीण जनार्धन अवचर (पार्श्वगायक गीतकार ,संगीतकार) -मांगी, प्रतिक्षा रमेश देवकाते- विहाळ- C A , ओंकार लबडे -National Handball Player. शेटफळ , शुभम देशमुख -State Tax Inspector (MPSC निवड), Archary – National Gold Medal-1,Silver Medal-2, Bronze -1, अनुराधा राऊत – करमाळा, सोलापूर विद्यापीठ योग स्पर्धा प्रथम पारितोषिक विजेती ,तन्मय तानाजी काटुळे – शेलगाव (वीराचे) MPSC मधून कर सहायक पदी निवड ( राज्यात पहिले ), किर्ती महादेव साळुंखे हे निंभोरे – MPSC, कर सहायक , शिवाजी ननावरे -कोंढेज, आश्लेषा कल्याण बागडे कझाकिस्तान येथे पार पडलेल्या एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत ब्राँझ पदक प्राप्त,अनिकेत मेनकुदळे – वांगी नं-3, NIT, रायपूर छत्तीसगड येथे निवड, निवास कन्हेरे, विविध देशांमध्ये चित्रांचे प्रदर्शन, J J art Mumbai मध्ये अभ्यास, सुप्रिया शरद बदे , उमरड ,Mpsc मधून सहाय्यक कृषी अधिकारी पदी निवड , शिवम राजेंद्र चिखले – रावगाव. 12 वी, YCM करमाळा, Archary, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर सुवर्ण पदक प्राप्त आदींना याप्रंगी गौरवण्यात आले.
याप्रसंगी करमाळा तालुका फ्रेंड सर्कल च्या वतीने मागील महिन्यात तालुक्यात आलेल्या पूर परिस्थितीमध्ये नुकसान झालेल्या गरजू शेतकऱ्यांना ७१ पोती खत वाटप करण्यात आले होते. यासाठी मदत निधी संकलन व खत वाटप नियोजनात विशेष सहकार्य केल्याबद्दल श्री अतुल वारे पाटील यांचा देखील सन्मान करण्यात आला. श्री अतुल वारे पाटील यांनी संपादित केलेल्या शिवतंत्र न्यूज या ऑनलाइन न्यूज पोर्टलचे प्रकाशन देखील यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्राच्या जीएसटी विभागाचे सहआयुक्त राजेंद्र कुऱ्हाडे यांनी करमाळा तालुका फ्रेंड्स सर्कल च्या कामाचे कौतुक केले. उपजिल्हाधिकारी श्री रा.शि. भोसले यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभल्यामुळे फ्रेंड सर्कल चे काम दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे.करमाळा तालुक्यातील विविध क्षेत्रातील अधिकारी, उद्योजक, व्यावसायिक, नोकरदार यांनी परस्पर सहकार्यांसाठी व व गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी करमाळा तालुका फ्रेंड सर्कलची स्थापना केली आहे. दरवर्षी या मीत्रांचे स्नेहसंमेलन आयोजित केले जाते. यावर्षीचे हे त्यांचे पाचवे स्नेहसंमेलन होते. या पुढील काळात अधिक उपक्रम राबविण्यात येतील तसेच जास्तीत जास्त यशस्वीत करमाळा तालुक्यातून घडवण्यासाठी आपल्याला काम करण्याचे आहे असे ध्येय या मित्रमंडळींनी ठेवले आहे.
उपजिल्हाधिकारी श्री रा.शि. भोसले यांनी याप्रसंगी बोलताना करमाळा मित्र पुरस्कारामुळे आपल्या जबाबदारीत आणखी वाढ झाली असून या पुढील काळातही अधिक गरजूंना मदत व मार्गदर्शन करणार असल्याचे प्रतिपादन केले. सोशल मीडियावर तसेच विविध पुस्तकातून मिळालेले माहिती खरी आहे की खोटी आहे हे तपासण्यासाठी त्यांनी साधी सरळ कसोटी सांगितली.
या कार्यक्रमासाठी नाव नोंदणी पासून ते जेवणापर्यंत चे नियोजन उत्कृष्ट झाले. जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट नियोजन करत कार्यक्रम यशस्वी केला. सत्यवान वलेकर, बालाजी वाघमारे, सुधीर अडसूळ, सौ पल्लवी मारकड, गणेश मारकड, रंगनाथ भुजबळ, संतोष लोंढे यांनी श्री राजेंद्र कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी पार पाडला.

 

       

     

https://mbfmaharashtra.com

Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close