
कर्जत येथे बलिप्रतिपदेनिमित्त बळीराजाला अभिवादन
कर्जत प्रतिनिधी

संभाजी ब्रिगेड कर्जत तालुक्याच्या वतीने बळीराजाचे पूजन करण्यात आले.
कर्जत मधील बाजारपेठेत त्याचे ऐतिहासिक महत्त्व सांगण्यात आले
यावेळी बोलताना संभाजी ब्रिगेडचे माजी तालुकाध्यक्ष राहुल नवले म्हणाले की शेतकरी, कष्टकरी जनतेचा कैवारी असणारा हा बळीराजा होता. या बळीराजाच्या काळामध्ये प्रजा सुखी होती. या लोकहितकारी राजाला कपटाने वामनाने मारले. बळीचे राज्य येण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया. या महासम्राट बळीराजाच्या स्मरणार्थ बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो

www.mbfmaharashtra.com